Tryambak Bapuji Thombre

Balkavi] (1890–1918 / India

तूं तर चाफेकळी! - Poem by Tryambak Bapu

'गर्द सभोंतीं रान साजणी तूं तर चाफेकळी!
काय हरवलें सांग शोधिसी या यमुनेच्या जळीं?'

ती वनमाला म्हणे 'नृपाळा, हें तर माझे घ्रर;
पाहत बसतें मी तर येथें जललहरी सुंदर,
हरिणी माझी, तिला आवडे फारच माझा गळा;
मैना माझी गोड बोलते, तिजला माझा लळा.
घेउनि हातीं गोड तिला त्या कुरणावरतीं फिरे-
भाऊ माझा, मंजुळवाणें गाणें न कधीं विरें'

'रात्रीचे वनदेव पाहुनी भुलतिल रमणी! तुला;
तूं वनराणी, दिसे न भुवनीं तुझिया रूपा तुला.
तव अधरावर मंजुळ गाणीं ठसलीं कसलीं तरी;
तव नयनीं या प्रेमदेवता धार विखारी भरी!
क्रीडांगण जणुं चंचल सुंदर भाल तुझें हें गडे,
भुरु भुरु त्यावर नाचत सुंदर कुंतल कुरळे उडे.
अर्धस्मित तव मंद मोहने, पसरे गालावरी;
भुललें तुजला हृदय साजणी, ये चल माझ्या घरीं.'

सांज सकाळीं हिमवंतीचे सुंदर मोतीं धडें;
हात लावितां परि नरनाथा तें तर खालीं पडे.
ती वनबाला म्हणे नृपाळा 'सुंदर मी हो खरी,-

(...अपूर्ण)
259 Total read