Chintamani Try Khanolkar

Arati Prabhu] (8 March 1930 – 26 April 1976 / Baglanchi Rai, Vengurla, Maharashtra / India

ये रे घना, ये रे घना - Poem by Chintamani Tryamb

ये रे घना, ये रे घना
न्हाऊ घाल माझ्या मना

फुले माझी अळुमाळू, वारा बघे चुरगळू
नको नको म्हणताना, गंध गेला रानावना

टाकुनिया घरदार नाचणार, नाचणार
नको नको म्हणताना, मनमोर भर राना

नको नको किती म्हणू, वाजणार दूर वेणू
बोलावतो सोसाट्याचा, वारा मला रसपाना
223 Total read