Chintamani Try Khanolkar

Arati Prabhu] (8 March 1930 – 26 April 1976 / Baglanchi Rai, Vengurla, Maharashtra / India

कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे - Poem by Chintamani Tryambak Khanolkar

कुणाच्या खांदयावर कुणाचे ओझे

कशासाठी उतरावे तंबू ठोकून
कोण मेले कोणासाठी रक्त ओकून
जगतात येथे कुणी मनात कुजून
तरी कसे फुलतात गुलाब हे सारे

दीप सारे जाती येथे विरुन विझून
वृक्ष जाती अंधारात गोठून जळून
जीवनाशी घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे
372 Total read