Bhaskar Ramchandra Tambe

B. R. Tambe] (27 November 1874 - 7 December 1941 / Mugawali, Madhya Pradesh / India

तुझ्या गळा माझ्या गळा - Poem by Bhaskar Ramchandra Tambe

'तुझ्या गळा, माझ्या गळा
गुंफू मोत्यांच्या माळा '
'ताई, आणखि कोणाला ?'
'चल रे दादा चहाटळा !'

'तुज कंठी, मज अंगठी !'
'आणखि गोफ कोणाला ?'
'वेड लागले दादाला !'
'मला कुणाचे ? ताईला !'

'तुज पगडी, मज चिरडी !'
'आणखि शेला कोणाला ?'
'दादा, सांगू बाबांला ?'
'सांग तिकडच्या स्वारीला !'

'खुसू खुसू, गालि हसू'
'वरवर अपुले रुसू रुसू '
'चल निघ, येथे नको बसू'
'घर तर माझे तसू तसू.'

'कशी कशी, आज अशी'
'गंमत ताईची खाशी !'
'अता कट्टी फू दादाशी'
'तर मग गट्टी कोणाशी ?'
288 Total read