Bhaskar Ramchandra Tambe

B. R. Tambe] (27 November 1874 - 7 December 1941 / Mugawali, Madhya Pradesh / India

नववधू प्रिया मी - Poem by Bhaskar Ramchan

नववधू प्रिया मी, बावरते
लाजते, पुढे सरते, फिरते

कळे मला तू प्राण-सखा जरि,
कळे तूच आधार सुखा जरि
तुजवाचुनि संसार फुका जरि
मन जवळ यावया गांगरते

मला येथला लागला लळा
सासरि निघता दाटतो गळा
बागबगीचा, येथला मळा
सोडिता कसे मन चरचरते !

जीव मनीचा मनी तळमळे
वाटे बंधन करुनि मोकळे
पळत निघावे तुजजवळ पळे
परि काय करू ? उरि भरभरते

अता तूच भय-लाज हरी रे !
धीर देउनी ने नवरी रे
भरोत भरतिल नेत्र जरी रे !
कळ पळभर मात्र ! खरे घर ते !
372 Total read