स्वप्नाना मनाच्या भोवर्यातून खेचून काढायचे आहे
आणि त्यांना वेचता यावे म्हणून
अस्तित्वात असलेल्या संकुचित वृत्ती ला
दूर कुठेतरी सोडून द्यायचे आहे....
कारण परत एकदा जायचे आहे मजला स्वप्नाच्या दशकात#
वाळवंटात पडणार्या पाण्याच्या थेंब सारखे
होते तुझे माझा आयुष्यात येणे.....
धूळ खात पडलेले ह्रदय पुन्हा
एकदा साफ करण्यात आले होते
स्वप्ना च्या आलमारी अलगद
उघडण्यात आल्या होत्या
सोबतच शेजारील मन लांबून
हे सगळे काही पाहत होते....
मधेच वार्या ने कानांना
सूर संगीत प्रधान करात गेला
जलधारा नतमस्तक होऊन
आनंदात सहभागी झाल्या होत्या...
सुर्य आणि चंद्र यांचा
लपंडाव तर चालू होता त्यातच
सूर्य जिंकला तर पक्षी नाचत गात
घिरट्या घालत असे
आणि चंद्र जिंकला तर मधेच
चांदणी डोकावून पहात...
असे सर्व चालत असताना
एके दिवशी पुनः एकदा वाळवंट झाले....!!!!