Apurva Phulari

27 October
Send Message

बाळा

माहित नाही़ मजला कोण आहेस, तु पण एवढें सांगते माझं सर्वस्व आहेस तु....
बाळा तु, म्हणजे कुण्या कलाकाराची हि भव्य कामगिरी, थेंब पावसाचे असे शिंम्प्ल्यात पडता मोत्यांपरी डूलते,
तसेंच अगदी तु आम्हाच्या जिवनात आला आहेस... तुज सांगु का एक....
थोर भाग्यवंत आम्ही केली असेल साता जन्मा ची पुण्यांई म्हणून नेमिले आई वडील आम्हास.....!!

माहित नाही़ मजला कोण आहेस तु, पण एवढें की माझं सर्वस्व आहेस तु......
बाळा जि मुलगी आधी अल्लड असते, ती लग्नानंतर शहाणी होते
पण जि आई बनते ना, ती पुन्हा आपल्या बाळा साठी अल्लड होते..
बाळा माझी आई मजला जपते किती आज जनिले त्याचे कारण..
जपिले आईनी मजला तसेच जपेन तुझं...!!

माहित नाही़ मजला कोण आहेस तु, पण एवढें की माझं सर्वस्व आहेस तु......
बाळा तुझे येणें म्हणजे, चिखलात मधेंच एक कमळा चे फूल जसे डोकावून् पाहते ना अगदी तसेच आहे....
तुझे येणे म्हणजे थोडा पाऊस पडून गेला आणि अलगद ऊन पडते सोबतच इंद्रधनुष्य च्या रंगानी पूर्ण धरणी सुखावून जाते तसें आहे.....!!

माहित नाही़ मजला कोण आहेस तु, पण एवढें की माझं सर्वस्व आहेस तु.....
तसेच तुझे येणे म्हणजे दवबिंदू च्या प्रेमळ स्पर्शानि, मनमोकळे बोलावे तसें आहे..
बाळा तुझे येणे म्हणजे, कोवळ्या पहाटे माझा अंगणात सुगन्धित असा मोगरा पसरला तसें आहे..
बाळा तुझे येणे म्हणजे, मनातल्या शंकाकुशंका यांना दूर फेकून
मनात एक जिंकण्याची आस निर्माण करणे तसें आहे....!!

माहित नाही़ मजला कोण आहेस तु, पण एवढें की माझं सर्वस्व आहेस तु.....
बाळा शेवटी एवढेच सांगते तु मुलगी असो वा मुलगा पण माझं प्रेम बाळा वर नेहमी निस्सीम असेल आणि आता तर येण्याची तसेच तु आई म्हणशील याची आतुरता हि वाढत जातं आहे....!!
I love you baby.....


Apurva Phulari (Porwal)
( एक आई )
223 Total read